‘मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे : पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पोलिसांच्या नियोजनामुळे यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक नेहमीपेक्षा लवकर संपली, आणि सर्व मिरवणुकी शांततेने पार पडल्या यामुळे पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ‘मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे’ अशा शब्दांमध्ये पोलिसांच्या कामगिरीचे आज सोमवारी कौतुक केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5c0d293a-bff1-11e8-a5aa-bf931d859532′]

या बाबत अधिक माहिती अशी की, विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि इतर साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये तणाव निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केले आणि त्याची अचूक अंमलबजावणी केल्यामुळे मिरवणुकीत त्याचा परिणाम दिसून आला, असे डॉ. व्यंकटेश यांनी सांगितले. तसेच पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक दुपारी साडेबाराच्या सुमारास संपली.

इतकेच नव्हे तर  पुण्यात मानाच्या पाच गणपती मंडळांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार, सर्व मंडळांमध्ये पंधरा मिनिटांचे अंतर राखता आले नसले, तरीही इतर अनेक मंडळे इतर वर्षांच्या तुलनेत लवकर मिरवणुकीत दाखल करण्यात पोलिसांना यश आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी विविध मंडळांवर कारवाई करून ३३ उपकरणे जप्त केली. तसेच विविध कलमांखाली ७५ जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. याचबरोबर मिरवणुकीमध्ये चोरी करणारी मालेगावच्या एका टोळीलाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ७५ मोबाईल जप्त करण्यात आले.

कुठे आहेत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा आणि महामंडळ ? : धनंजय मुंडे

तसेच यादरम्यान पुण्यातील वाहतुकीची स्थिती म्हणजे  शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरून शास्त्री रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर बहुतांश मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर मिरवणुकीमुळे बंद असलेले शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले.

मानाच्या गणपतींची वेळ

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट  : रात्री ११.०५ ते पहाटे ४.५८
केसरीवाडा                                     : दुपारी १.४० ते सायंकाळी ७.०५
कसबा गणपती                                : सकाळी १०.३० ते दुपारी ४.०८
तुळशीबाग मंडळ                            : दुपारी १२.२५ ते सायंकाळी ६.२५
तांबडी जोगेश्‍वरी                             : सकाळी १०.३५ ते सायंकाळी ५.१३
गुरुजी तालीम                                 : सकाळी १०.४३ ते सायंकाळी ५.३३
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट : सायंकाळी ७.५० ते पहाटे २.३०
अखिल मंडई मंडळ                        : रात्री ८.११ ते पहाटे ४.३०