अन्… ‘गूढ’ आवाजाने धायरी परिसर दणाणून सोडला

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील धायरी परिसरात आज पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान अचानक मोठा आवाज झाला . हा आवाज इतका मोठा होता की ,या परिसरात राहणाऱ्या लोकांना हा बॉम्ब चा स्फोट आहे की काय असे वाटू लागले. खरेतर हा फटाक्यांचा आवाज होता . पण या आवाजाची तीव्रता इतकी जास्त होती की, काही नागरिक या आवाजाने भयभीत झाले . या आवाजामुळे काही नागरिकांच्या घराच्या काचा देखील तुटल्याचे बोलले जात आहे.

या घटनेबाबत सिंहगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , रात्री तीन वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात लोकांकडून फटाके फोडण्यात आले. या फटाक्यांमध्ये आतिषबाजी करिता वापरण्यात येणारा रॉकेट किंवा बॉम्ब असावा अशी शक्यता त्यांनी वर्तविली. या फटाक्यांची तीव्रता जास्त असेल किंवा रॉकेट फोडताना कदाचित चुकीचा लावला गेल्यामुळे तो आकाशात न जाता नागरी वस्तीतच फुटला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेबाबत तेथील नागरिकांशी बातचीत केली असता , काही जणांकडून सांगण्यात आले की, “काही जण दुचाकीवरून आले असताना त्यांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्याकडून फटाके फोडण्यात आले. त्यातीलच एका फटाक्यांची तीव्रता इतकी जास्त होती की, या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काही काळासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a5d795a-9ae6-11e8-8a12-d74937a95984′]

वाढदिवसाच्या नावाखाली भलतेच

हल्ली पुण्यात रात्री भररस्त्यावर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याचा आडमुठा ट्रेंड वाढतोय. वाढदिवसाच्या नावाखाली काही लोक हुल्लडबाजी करताना आढळतात. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसतो आहे. रात्री अपरात्री होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. धायरी येथील घडलेली ही घटना तरी नागरिकांसाठी निव्वळ डोकेदुखी ठरली असेल यात शंका नाही. अशा घटनांमध्ये प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B01IH4QZ9A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4be822c5-9ae6-11e8-b718-43fba3138c33′]