बेस्ट नागीण डान्स प्रकरणी माधवी जुवेकर सह 7 जण बडतर्फ

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

बेस्टच्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ओंगळवाणे नृत्य करणारी बेस्टची कर्मचारी आणि अभिनेत्री माधवी जुवेकर तसेच तिच्यावर नोटांची उधळण करणारे सहा अधिकारी-कर्मचारी अशा एकूण ७ जणांवर बेस्ट प्रशासनाने बडतफीर्ची कारवाई केली आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0662f9e7-aa08-11e8-9882-e30814966e56′]

बेस्टच्या वाडाळा आगारात  ८ नोव्हेंबर २०१७ रोजी आयोजित कार्यक्रमात नृत्य करत असताना माधवी जुवेकरवर पैशांची उधळण केली होती. माधवी जुवेकर तोंडात नोट धरून नाचतानाही या व्हिडिओत दिसत होती. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेस्ट प्रशासनाने चौकशी सुरू केली होती. त्यात माधवी जुवेकरसह संबंधित कर्मचारी-अधिकाऱ्यांवर बेस्टने ठपका ठेवला होता.
दीपक मानकर यांना कारागृहात मिळणार घरचे जेवण आणि औषधे 

याप्रकरणी चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज कारवाईचे पाऊल उचलण्यात आले असून माधवी जुवेकरसह ७ जणांना बेस्ट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय अन्य पाच जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारसही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मोदींना पर्याय जनताच देईल : शरद पवार