आता मोदींचा येणार बायोपिक ; हा अभिनेता साकारणार मोदींचा रोल 

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – आता बॉलिवूड मध्ये बायोपिकचा जमाना आला असून भाग मिल्का भाग, मेरी कॉम पासून सुरु झालेला हा बायोपिकचा प्रवास,गुरु, दंगल,सुलतान ,पॅडमॅन,ठाकरे, ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या बायोपिक पर्यंत येऊन थांबला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक आले असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येणार असून या चित्रपटात मोदींचा रोल सिने अभिनेते विवेक ओबेरॉय साकारणार आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लवकरच एक बायोपिक बनणारअसून चित्रपटातील नरेंद्र मोदी याची भूमिका  अभिनेता विवेक ओबेरॉय साकारणार आहेत.   पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित बोयोपिकचे शूटिंग जानेवारी २०१९ पासून सुरू होणार असून हा चित्रपट दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शूट केला जाईल. तर अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी  त्याच्या भूमिकेची तयारी देखील सुरू केली आहे असे ही वृत्त आहेत. चित्रपट शीर्षक अद्याप निश्चित केले गेले नाही. परंतु चित्रपटाचे क्रिप्ट आणि पात्र अंतिम झाली आहेत.तसेच या बायोपिक चित्रपटाचे दिग्ददर्शन ओमंग कुमार हे करणार आहेत.

त्याच प्रमाणे अभिनेते परेश रावल हे देखील मोदींची भूमिका साकारणार असल्याचे समजते मात्र या वृत्ताला अदयाप कसलीही पुष्टी देण्यात आली नसून नरेंद्र मोदी याच्या तरुण पणाची भूमिका विवेक ओबेरॉय आणि त्यांच्या आजच्या जीवनाची भूमिका परेश रावल साकारतील असा अंदाज चित्रपट जाणकारांनी लावला आहे. तर मोदी यांच्या बायोपिक बद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असून त्यांच्या बायोपिक मध्ये काय दाखवले जाणार आहे यासंदर्भात सर्वच क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.  मोदींनी त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष केला आहे त्यांनी वडनगर स्टेशनवर चहा विकला असून त्यांनी शालेय जीवना पासून संघाच्या शाखेत जाऊन संघाची साधना केली आहे. त्यांचा तेव्हा पासून पंतप्रधान होई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. म्हणूच त्यांच्या जीवनाच्या संघर्षावर बायोपिक येऊ घातला आहे.