नरेंद्र मोदी यांना एक ओळ देखील हि इंग्रजी बोलता येत नाही

कोलकत्ता : पश्चिम बंगाल वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक ओळ हि इंग्रजी बोलता येत नाही. त्यांना इंग्रजी बोलताना कायम टेलिप्रॉम्पटरचे सहाय्य घ्यावे लागते आहे. अशी खरमरीत टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पश्चिम बंगाल मध्ये रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांची कसोटी पणाला लागली असून पश्चिम बंगाल मध्ये भाजप मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या इंग्रजीवर बऱ्याच नेत्यांनी टीका केली असली तरी मोदींनी अंतरराष्ट्रीय स्तरावर कमवलेली देशाची प्रतिमा कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे मोदींवर टीका करताना ममतांनी विचार करून बोलले पाहिजे असे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोलले आहे. एका कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हे विधान केले असून त्यांच्या इंग्रजी बद्दल प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्या ममता बॅनर्जी या काय पहिल्याच नेत्या नाहीत. या आधीही बऱ्याच नेत्यांना मोदींच्या इंग्रजीवर टीका केली आहे.

एका बंगाली वेबसाईटचा संदर्भ देत एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. सर्व मीडियाला हे माहित आहे कि मोदींना एक ओळ हि इंग्रजी बोलता येत नाही. मोदी नेहमी स्क्रीनकडे बघून इंग्रजी  बोलतात असे ममता बॅनर्जी यांनी म्हणले आहे. त्याच प्रमाणे ममता बॅनर्जी यांनी काल गुरुवारी आपण केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतून बाहेर पडत आहे असे जाहीर केले आहे.

काय आहे आयुष्यमान भारत योजना 
आयुष्यमान भारत हि भारतीयांच्या आरोग्य विम्याची महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर२०१८ मध्ये केला आहे. मोदींच्या या योजनेच्या माध्यमातून ४० कोटी लोकांना आरोग्य विम्याचे कवच दिले जाते आहे. आर्थिक विवंचनेमुळे आपल्या आरोग्याच्या प्रश्नांवर पैसे खर्च करण्याची ऐपत नाही अशा सर्व लोकांना भारत सरकारच्या वतीने ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. या योजनेचा भारतातील १० कोटी कुटुंबाना लाभ दिला जाणार असून १२ हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर या योजनेच्या एकूण खर्चापैकी निम्या पेक्षा अधिक रक्कम केंद्र सरकार करणार असून या योजनेच्या खर्चाचा काही भाग हा राज्य सरकारला उचलावा लागणार आहे.