मोदींशी निष्ठा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना काँग्रस नेत्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदींशी निष्ठा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्ता आल्यावर दाखवू अशी धमकी काँग्रेसचे नेते कबिल सिब्बल यांनी दिली आहे. सत्ता ही कायम राहत नाही, ती येत जात असते. त्यामुळे मोदींशी निष्ठा राखणाऱ्या अधिकाऱ्यांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ असा इशारा सिब्बल यांनी दिला आहे.

निवडणुकीमध्ये जय पराजय हा होतच असतो. आज देशामध्ये भाजपची सत्ता आहे उद्या काँग्रेसची सत्ता याईल. हे मोदींशी निष्ठा ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. अति उत्साह आणि मोदींशी निष्ठा ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमची नजर असून सत्तेत आल्यावर त्यांच्याकडे पाहून घेऊ असे सिब्बल म्हणाले.

राफेल प्रकरणावर कॅग सोमवारी आपला अहवाल देण्याची शक्यता असून तो संसदेतही मांडला जाणार आहे. त्यामुळे त्यावरही सिब्बल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्याचे महालेखापाल राजीव महर्षी हे अर्थ सचिव असतानाच राफेल करार झाला. त्यामुळे ते याबद्दल काही चौकशी करतील असं वाटतं नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. जे भ्रष्टाचारात सहभागी आहेत तेच चौकशी कशी करतील असंही ते म्हणाले. पहिले ते स्वत:ला वाचवतील आणि नंतर सरकारला.

देशात अघोषीत आणीबाणी असून लोकांना बोलण्याचीही मुभा नाही अशी टीकाही त्यांनी केली. अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईत एका भाषणादरम्यान बोलताना अयोजकांनी टीका करायला मनाई केल्याने वाद निर्माण झाला आहे.