मोदींचा राहुल गांधींना टोला ; काहींनी लोकसभेत डोळे मारण्याची गुस्ताखी केली आहे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज च्या सभागृहात १६ व्या लोकसभेतील शेवटचे भाषण केले आहे. त्यात त्यांनी राहुल गांधी यांना चांगल्याच कोपर खिळ्या मारल्या आहेत. संसदेत आल्या नंतर मला गळाभेट घेणे आणि गळ्यात पडणे यातील अंतर समजले आहे. काही लोकांनी तर लोकसभेतच डोळे मारण्याची गुस्ताखी केली आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पाच वर्ष आम्ही लोकसभेत भूकंपाच्या बातम्या ऐकल्या मात्र भूकंप झालाच नाही असे म्हणून नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी भूकंप आणण्याच्या गोष्टि केल्या तर कोणी विमाने उडवण्याचे प्रयत्न केले मात्र आपल्या लोकशाहीची उंची एवढी आहे कि तिच्या पर्यंत कोणतेच विमान पोचू शकले नाही असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

मला लोकसभेत आल्यावर अनेक गोष्टी नव्याने समजल्या त्यापैकी एक म्हणजे गळा भेट घेणे आणि गळ्यात पडणे. तसेच आपण पहिल्यांदाच लोकसभेत कोणाला तरी डोळा मारताना पाहिले आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. या भाषणात लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खर्गे यांची नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली भूमिका चोखपणे बजावाली आहे असे नरेंद्र म्हणाले आहेत.