राजकीय

उदयनराजे जनतेला म्हणतात, हमे तुमसे प्यार कितना….

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके अंदाजाने चर्चेचा विषय बनत असतात. त्याच प्रमाणे त्यांचा प्रेमळ आणि मनमोकळा स्वभाव हि सर्व महाराष्ट्राला परिचयाचा आहे. याच स्वभावाचा प्रत्यय सातारा नगरपालिकेच्या कार्यक्रमात सर्व साताराकरांना आला आहे. या कार्यक्रमात उदयराजे म्हणाले, कि तुम्ही भाषणे ऐकून बोर झाला असाल म्हणून मी तुमच्या साठी गाणे म्हणतोय आणि उदयनराजेंनी गाणे म्हणले सुद्धा.

कुदरत या हिंदी चित्रपटातील किशोर कुमारांच्या आवाजातील गाणे उदयनराजेंनी सातारकर जनतेला उद्देशून म्हणले आणि उपस्थितांचे कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानले. ‘हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना’ हे गाणे उदयराजेंनी म्हणले आणि उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून उदयनराजेंच्या गाण्याला प्रतिसाद दिला. उदयनराजेंनी गाणे संपवताना आपला आवाज सध्या खराब असल्याने आपण संपूर्ण गाणे म्हणू शकत नाही अशी प्रांजळ कबुली हि दिली आहे.

सातारा नगरपालिकेच्या वतीने कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शाहू कलामंदिर येथे घेण्यात आला होता. सर्वांची भाषणे झाल्यानंतर उदयनराजे भाषणासाठी उभे राहिले त्यानंतर त्यांनी हे गाणे गायले आहे. त्यांच्या या वेगळ्या अंदाजाचे सर्वांनीच स्वागत केले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या