राष्ट्रवादीला हवे औरंगाबाद, आघाडीत ३ जागांचा पेच

मुंबई ­: पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकसभा जागावाटपाची बोलणी सुरू असून नगर, नंदूरबार आणि औरंगाबाद या तीन जागांचा तिढा अद्याप कायम आहे. येत्या १५ तारखेला दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून, त्यात यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अहमदनगरची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची जागा काँग्रेसला हवी आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील हे इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ही जागा सोडायला तयार नाहीत. काँग्रेसला भावनिकदृष्­ट्या महत्त्वाच्या असलेल्या नंदूरबारची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आहे. काँग्रेसच्याच कोट्यातील औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. यामुळे जवळपास एकमत होत आलेल्या जागावाटपात या तीन जागांमुळे पेच निर्माण झाला आहे. येत्या १५ तारखेला दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार असून त्यात हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तोडगा काढा नाहीतर तमाशा करू : मनसे