निर्धार परिवर्तनाचा ; राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन 

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवसांचा अवकाश राहिला असताना आता भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीने चांगलेच रानतापवायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने महाराष्ट्रव्यापी ‘निर्धार परिवर्तनाची यात्रा’ हि तळकोकणातून सुरु केली जाणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादीने मोठे शक्ती प्रदर्शन केले असून रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून आणि चवदार तळ्यावर बाबासाहेब आंबेकरांना  अभिवादन करून या यात्रेची सुरुवात केली जाणारा आहे. या यात्रेची पहिली जाहीर सभा महाड येथे भिलारे मैदानावर आहे.

 राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार या ‘निर्धार परिवर्तनाचा यात्रा’  शुभारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सभेला पक्षाचे २० हजार कार्यकर्ते हजेरी लावणार असल्याची माहिती राष्ट्रवादींच्या प्रवक्त्यांच्या वतीने सांगण्यात आली आहे. उद्या गुरुवारी याच परिवर्तन यात्रेत रायगड लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. महाड मधूनच प्रचाराची सुरुवात करून प्रचाराची राळ उडवून देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. म्हणून उद्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणारी महाड येथील सभा महत्वाची ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक प्रचाराचा नाराळ फुटणार ?
‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेत राष्ट्रवादी आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे बोलले जाते आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत आघाडीच्या वाटाघाटी करत असताना इकडे तळकोकणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचाराची केलेली तयारी हि सूत्रबद्ध राजकारणाची हालचाल आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत राष्टवादीचे रायगडचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांच्या नावावर एकमत करण्यात आले आहे.

सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या कामाला लागा म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच पक्षाने महाड येथे घेतलेला मेळावा सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठीच असावा असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. गत  निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांच्या विरोधात निवडणूक लढवून सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. या निवडणुकीत हि पक्षाने त्यांनाच उमेदवारी देऊन गेल्या निवडणुकीची कसर भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांनाच  उमेदवारी देण्याची तयारी करण्यास सुरु केले आहे.