क्राईम स्टोरी

भांडणात राग झाला अनावर ; पुतण्याने केला चुलत्याचा खुन

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – क्षुल्लक वादातून पुतण्याने काकावर लाठीने प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या पडोली पोलीस ठाणे हद्दीतील साखरवाही येथे उजेडात आली. दिलीप बापूराव शेरकी (५१) असे मृतकाचे तर वैभव पुंडलिक शेरकी (३४) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप शेरकी आणि त्याचा पुतण्या वैभव यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचला. यावेळी वैभवने काठीने दिलीप शेरकी यांच्यावर प्रहार केले. यात दिलीप शेरकी गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले.

उपचारादरम्यान दिलीप शेरकी यांचा मृत्यू झाला. पडोली पोलिसांनी आरोपी वैभव शेरकीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ठाणेदार वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागेश जायले पुढील तपास करीत आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या