‘या’ पाच शहरात होणार नवी पासपोर्ट कार्यालये

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रात सध्या असलेलया पासपोर्ट कार्यालयामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये आता चंद्रपूर आणि बारामती शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता पासपोर्ट मिळणे अधिक सुलभ होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, बारामती,माढा या शहरांमध्ये पासपोर्ट ची नवी कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली जात आहेत.