क्राईम स्टोरी

चेहऱ्यावरील मेकअप टिकत नसल्याने नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – कौटुंबीक वादातून किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आत्महत्या केल्याचे वाचले असेल. मात्र, नाशिकमध्ये एका नवविवाहितेने चेहऱ्यावरील मेकअप टिकत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या अंबडमध्ये घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रखमा भास्‍कर खरचान (वय-२७) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव आहे.

आत्महत्या करणारी महिला अंबडमधील दत्तनगर भागात राहते. तिने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह रुग्णालयात पाठवला.
मृतदेहाचा पंचनामा करीत असताना पोलिसांना एक चिठ्ठी सापली आहे. यामध्ये मृत महिलेने ‘माझ्या डोळ्यातून सतत पाणी येते. त्यामुळे डोळ्यांना काजळ लावता येत नाही.

याशिवाय चेहऱ्यावर मेकअप देखील टिकत नाही’, असे लिहले आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. त्यामुळे या आत्महत्येमागे इतर काही कारण आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button