स्वतःच्या कुत्र्याचा फोटो ट्विट वर टाकून “आता होऊ दे..काटे की टक्कर” – नितेश राणे 

मुंबई ; पोलीसनामा ऑनलाईन: कोकणातील रामदास कदम विरुद्ध राणे हा वाद सर्वश्रुत आहे. रामदास कदम यांनी एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्यावर विचित्र टीका केली होती. त्यानंतर राणेंचे सुपुत्र नितेश यांनीही आता वादग्रस्त ट्वीट करत याआधीही उत्तर दिलं होतं.
काँग्रेस आमदार नितेश राणे शिवसेनेचे पर्यावरण मंत्री  रामदास कदम यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आहे. दोघांनीही एकमेकांवर आक्रमक टीका केली आहे. नितेश राणे यांनी शुक्रवारी एक ट्वीट करत रामदास कदम यांना कुत्र्याची उपमा दिली होती. त्यानंतर भडकलेले रामदास कदम आज म्हणाले की, ‘नितेश हाच कुत्रा आहे.’
रामदास कदम यांनी नितेश राणे यांच्यावर केलेल्या पलटवारानंतर नितेश यांनी पुन्हा एक जहरी ट्वीट केलं आहे. राणे-कदम वादातून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती ढासळत आहे, याची कल्पना येते, अशी प्रतिक्रिया आता राजकीय विश्लेषक देत आहेत. यामध्ये अक्षरशः नितेश राणे यांनी स्वतःच्या  कुत्र्याचा फोटो ट्विट केलं आणि त्यात ”हा आमचा zuko .. या पुढे रामदास कदम ला हाच उत्तर देईल..टक्कर बराबरी ची झाली पाहिजे ना बिचारया zuko वर अन्याय नको!आता होऊ दे..काटे की टक्कर!!!” असं लिहिलं आहे
काय म्हणाले होते रामदास कदम?
नारायण राणे यांची शिवसेनेवर बोलण्याची करण्याची लायकी नसल्याची टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदम यांनी नारायण राणेंवर शाब्दिक हल्लाबोल केला.
‘नारायण राणे आधी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर भाजप झालं. आता आठवलेंचा पक्ष बाकी आहे,’ असा टोलाही कदम यांनी राणेंना लगावला. ज्या शिवसेनेच्या जीवावर नारायण राणे यांनी हे वैभव कमावलं त्या राणेंची ‘मातोश्री’वर बोलण्याची औकात आहे का, असंही कदम म्हणाले. तसंच नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग रामदास कदम धुतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
आणि नितेश राणेंनी केली रामदास कदम यांची कुत्र्यासोबत तुलना
रामदास कदम यांच्या टीकेला नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान रामदास कदम म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं असल्याची आक्षेपार्ह टीका केली आहे. नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणाले की, ” ”स्व. मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात..उद्धव ठाकरें नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे…रामदास कदम च्या रुपात!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही..भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असं झोंबणारं ट्विट केलं आहे.