शिवसेनेतर्फे निलेश राणे यांच्या फोटोला काळे फासून घातला चपलांचा हार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. याचाच निषेध म्हणून, परभणीत शिवसेना महिला आघाडीतर्फे निलेश राणे यांच्या फोटोला काळे फासून चपलींचा हार घालण्यात आला.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता, मात्र बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवले असा घणाघाती आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला होता. इतकेच नव्हे तर अशे अनके आरोप त्यांनी केले होते. दरम्यान निलेश राणे यांच्या त्या वक्तव्यामुळे सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर सोशल मिडीयावरही निलेश राणे यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान परभणीतिल शिवसेना महिला आघाडीतर्फे छ. शिवाजी महाराज चौकात परभणी विधानसभा प्रमुख अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे यांच्या फोटोला काळे फासून चपलांचा हार घालण्यात आला. इतकेच नव्हे तर कोंबडीचोर नारायण राणे आणि निलेश राणे यांचा मुर्दाबाद अश्या घोषणाही त्यावेळी देण्यात आल्या.

यावेळी शहरसंघटक कुसुम पिल्लेवाड, उपशहर प्रमुख सविता मठपती, कमलताई कासले,अनिताताई खिस्ते, वर्षा काळे, कविता अंदुरे, सुनीताताई कांबळे, गंगाबाई मांडे,आरती वाघ, वैशालीताई सामाले, प्रिया देशपांडे आणि महिला आघाडीच्या आदी महिला उपस्थित होत्या.