राजकीय

आता राहुल गांधींनी काही केलं तरी पंतप्रधान होणार नाही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती झाली आहे. त्यावर त्यांच्या या युतीवर माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जेव्हा राहुल गांधींना पंतप्रधान होता आलं असतं तेव्हा झाले नाहीत, आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, असं ट्विट नीलेश राणे यांनी केले आहे.

भाजपा विरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. त्यावर शनिवारी लखनऊमध्ये सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या आघाडीत सपा-बसपाने काँग्रेसला सामील केलं नाही. या पार्श्वभूमीवर नीलेश राणेंनी ट्विट केले. ज्या राज्यातून काँग्रेसचे अध्यक्ष निवडून येतात त्याच राज्यात त्यांना सोबत घेण्याची गरज वाटत नाही. जेव्हा राहुल गांधींना पंतप्रधान होता आलं असतं तेव्हा झाले नाहीत आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

मायावती आणि अखिलेश यांच्या पत्रकार परिषदेत मायावतींनी भाजपसह काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेस-भाजपाची अवस्था एकसारखीच आहे, दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत. काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती. तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल. यापुढे काँग्रेससोबत आघाडी करणार नाही. आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असं मायावतींनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमिवर नीलेश राणेंनी हे ट्वीट केले आहे.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1084014353484050432

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या