नीरव मोदीच्या त्या महागड्या पेंटिंग्जसह कारचा होणार लिलाव

मुंबई : वृत्तसंस्था – पीएमएलए न्यायालयाने नीरव मोदीच्या कलेक्शनमधील १७३ पेंटींग्ज आणि ११ कारचा लिलाव करण्याची परवानगी ईडी (अंमलबजावणी संचलनालय) ला दिली आहे. नीरव मोदीच्या या पेंटिंग्जची किंमत ९ कोटी रुपये आहे. त्यांचा लिलावर करून जमा झालेले पैसे न्यायालयात जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

नीरव मोदीच्या मुंबईतील घरांवर छापे टाकून ईडीने मौल्यवान वस्तू जप्त केल्या होत्या. त्यात नीरव मोदीच्या बंगल्यामध्ये एम. एफ. हुसेन, के. के. हैब्बर, अमृता शेरगील यांच्यासारख्या नामांकित चित्रकारांच्या पेंटींग्जचे कलेक्शन मिळून आले होते. तसेच त्याच्या ११ कारही त्या ईडीने जप्त केल्या होत्या. त्यांचा लिलाव करून पैसे वसूल करण्याची परवानगी ईडीने न्यायालयाकडे अर्जाद्वारे मागितली होती. पीएमएलए न्यायालयाने तो अर्ज मान्य करत प्राप्तिकर विभागाला लिलाव प्रक्रिया पार पाडून त्यातून जमा होणारे पैसे न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.