अमित शहांच्या सल्ल्यानंतरच मी ‘तो’ निर्णय घेतला : नितीशकुमारांचा खुलासा

पाटणा वृत्तसंस्था – भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सल्ल्यानंतर निवडणूक राणनितीकार प्रशांत किशोर यांचा संयुक्त जनता दल पक्षात समावेश केला, असा खुलासा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले. अमित शहांनी प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी दोन वेळा सल्ला दिला होता, असं नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखती दरम्यान ते बोलत होते. प्रशांत किशोर राजकारणात कसे आले, याचा खुलासा नितीशकुमारांनी केला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता. त्यानंतर काही काळात त्यांना पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले. नितीशकुमार यांचा वारसदार म्हणूनच प्रशांत किशोर यांना पक्षात आणण्यात आले, अशी चर्चा तेव्हापासून सुरू आहे. यावर किशोर यांच्याबद्दल जिव्हाळा आहे. पण आपण कोणत्याही साम्राज्यात राहत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे माझा वारसदार म्हणून पाहण्यात काही हरकत नाही, असं नितीश कुमारांनी सांगितलं.प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला असलातरी ते आमच्यासाठी नवे नाहीत. २०१५ मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या पक्षासाठी काम केले होते. त्यामुळे त्यांचा आणि माझा जवळचा संबंध आहे. त्यानंतर काही वेळ ते वेगळ्या गडबडीत होते. अमित शहा यांनी दोन वेळा माझ्याशी बोलून प्रशांत किशोर यांना माझ्या पक्षात घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हे सर्व घडून आले, असं नितीशकुमारांनी सांगितलं.

तरुणांना संयुक्त जनता दलाकडे आकर्षित करण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे सोपवले आहे. ज्यांच्याकडे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीअशा तरुणांनाही या क्षेत्राकडे आणण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव माझ्याविरोधात काहीही बोलत असलेतरी माझ्या त्यांना सदिच्छाच आहेतअसंही त्यांनी म्हटलं.