महत्वाच्या बातम्या

सुराज्यसाठीच पक्ष आणि संघ -नितीन गडकरी

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन- जातीचा उल्लेख करणार्याला ठोकतो तर सर्व समाजाला सुराज्यसाठी काम करणार्‍याला शाबासकीची थाप देतो असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या पुनरूत्थान समरसता गुरूकुलमच्या रामकृष्ण सभागृह, चिंचवड येथील कार्यक्रमात केले. यावेळी भुमीवंदन तसेच 10 आदिवासी कुटूंबांना गोमाता दान गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिपिंग कार्पोरेशन बोर्ड, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रदिप रावत, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, आमदार लक्ष्मण जगताप, महाराष्ट्र राज्य मदत पुनर्वसन व पुनर्स्थापन महामंडळाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव, नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, लोक लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरिष प्रभुणे, सतिश बोर्डे, शकुतंला बंसल आदी उपस्थित होते.

यावेळी नितिन गडकरी म्हणाले, देशातील सर्व समाजाच्या घटकांना एकत्र आणून त्यांच्यां सर्वांगतेने विकास घडवून आणने महत्वाचे आहे. जोपर्यंत आपण हे साध्य करणार नाही तोपर्यंत देशाचा विकासाला चालना मिळणार नाही. सरकार त्या दिशेने सध्या विविध योजनेतून कार्य करत आहेत. सध्या जंगलातल्या वनस्पतीच्या आधारे बायो पेट्रोल व डिझेल उत्पादनच्या तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलं आहे. तसंच विमानाला लागणार्या बायो पेट्रोलची चाचणीही करण्यात आली. लवकरच तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून सध्या सूरु असलेली हजारो रूपयांचे पेट्रोल व डिझेलची आयात भारत लवकरच बंद करेल. तसेच जंगल परिसरात असणाऱ्या भटक्या, विमुक्त, आदिवासी समाजांच्या बेरोजगार तरूणांना कामे मिळतील.

गुरूकुलम संस्था आदिवासी, भट्क्या, विमुक्त जातींच्या कुटूंबांचं पुनर्वसन करून दर्जेदार शिक्षणही प्रधान करत आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणून महत्वाच काम पुनरूत्थान समरसता गुरूकुलम करत असल्याचा मला अभिमान असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्या या कामासाठी भविष्यातल्या वाटचालीकरीता सीएसआरच्या अंर्तगत 5 कोटीं रूपयांची आर्थिक मदत व गुरूकुलमसाठी सरकारला शक्य असेल तितकी जागा लवकरच देण्याचं गडकरी यांनी झाहीर केले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या