स्वस्त झाला Nokia 5.1 Plus ; ऑफलाइनही उपलब्ध 

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच झालेला Nokia 5.1 Plus हा स्मार्टफोन केवळ ऑनलाइन खरेदी करता येत होता. परंतु आता नोकियाचा हा स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता हा स्मार्टफोन लवकरच ऑफलाइन पद्धतीने खरेदी करता येणार आहे. आज म्हणजेच 15 जानेवारी पासून हा स्मार्टफोन ऑफलाइन प्रकारात अर्थात देशभरातील मोबाइल दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. नोकियाचे मोबाइल फोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबल या कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी लाँच झाल्यानंतर हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्ट आणि Nokia.com/phones या संकेतस्थळावरुन खरेदी करता येत होता. विशेष म्हणजे  ग्लॉस ब्लॅक, ग्लॉस व्हाइट आणि ग्लॉस मिडनाइट ब्ल्यू अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता युजर्सना रंगांची चाॅईस मिळणार आहे.
हा फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बाब अशी आहे की, या फोनच्या किंमतीतही कपात झाली आहे. त्यामुळे सर्वांच्या खिशाला परवडणारा असा हा फोन असणार आहे. भारतात हा फोन लाँच करण्यात आला त्यावेळी या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी होती. पण आता या फोनच्या किंमतीत 400 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता 10 हजार 599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा झाल्यामुळे आणि खास करून नोकिया वापरण्याची इच्छा असणाऱ्यांकडून याला मागणी वाढू शकते.
काय आहेत फोनची वैशिष्ट्ये 
या फोनमध्ये ड्युअल सिमकार्ड, अँड्रॉयड ओरिओ ८.१ आणि ५.८६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, २.५ डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन, पी ६० प्रोसेसर, ३ जीबी रॅमसह ३२ जीबीची स्टोरेज, ड्युअल रिअर कॅमेरा असून पहिला १३ मेगापिक्सलचा तर ५ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. ३०६० एमएएच क्षमतेची बॅटरी असून यूएसबी टाइपसी, ३.५ एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही या मोबाइलमध्ये आहे.