नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना देलं मोठं गिफ्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर १२० रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे, तर अनुदानित सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांची घट केली आहे, अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे.

सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात केल्यामुळे १४.२ किलोचा अनुदानित सिलिंडर ५००.९० रुपयांऐवजी आता ४९४.९९ रुपयांना मिळणार आहे. हे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. भारतातील सर्वात तेल पुरवठादार कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं ही माहिती दिली आहे.

एलपीजी सिलिंडरचे या महिन्यात दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले आहेत. १ डिसेंबर रोजी अनुदानित सिलिंडरचे दर ६.५२ रुपयांनी कमी केले होते. तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात १३३ रुपयांनी स्वस्त करण्यात करण्यात आला होता.