मला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हायचे नाही – सुप्रिया सुळे 

दौंड (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री पद हे माझे स्वप्न नाही आणि मला सध्या लोकसभेची निवडणूक लढायची आहे मी त्याच्या तयारीत आहे. मी माझ्या पक्षाकडे लोकसभेच्या निवडणुकीची उमेदवारी मागितली आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हणले आहे. त्या दौंड येथे पत्रकरांशी बोलत होत्या. तुम्हाला महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असे विचारले असता मुख्यमंत्री स्त्री किंवा पुरुष हे महत्वाचे नाहीच मुळी तसेच महिला मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र्राचे प्रश्न सुटणार नाहीत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आपला ‘महिला मुख्यमंत्री’ या प्रतीकात्मक पदावर अजिबात विश्वास नाही असे सुप्रिया सुळे यांनी म्हणले आहे. सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत दौंडचे  माजी आमदार  रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे या सुप्रिया सुळे यांच्या सोबत उपस्थित होत्या.

लोकसभेच्या सभापती माझ्या संसदीय कामकाजाचे कौतुक केले आहे. लोकसभेतील मी सर्वात कार्यशील खासदार आहे असे त्या म्हणाल्या आहेत. महिला मुख्यमंत्री झाल्याने महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही कारण राजस्थानची मुख्यमंत्री महिला असताना सुद्धा त्या राज्यात महिला छेडछाड मुक्ती होऊ शकले नव्हते. राजकारणातील मोठ्या पदाची निवड हि लिंगभेद विरहित असली पाहिजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयाने लोकांची आर्थिक घडी उसवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन असणाऱ्या सरकारवर लोक नाराज असणार आहेत. तर सरकार वर टीका करणाऱ्या शिवसेनेचे सत्तेत राहणे योग्य नाही असे सुप्रिया सुळे यांनी म्हणले आहे.

आरक्षणाला पाप कि योजना म्हणणारे नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्या नंतर आता लोकसभेत पराभव होऊ नये म्हणून सवर्णांना आरक्षण देत आहेत. तर रामविलास पासवान आणि थावरचंद गहलोत या केंद्रीय मंत्र्यांनी संसदेतच हे आरक्षण न्यायालयात टिकेल का असा सवाल केल्याने मोदी सरकारच्या मंत्री मंडळात एकजिनसीपणा नाही हे सिद्ध झाले आहे.