पुण्याची लोकसभेची जागा कोणी लढवायची हे ठरलेले नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करण्याचे निश्चित आहे. जागावाटपासाठी तीन बैठका झाल्या आहेत पण पुण्याची जागा कोणी लढवायची ठरलेले नाही, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पुण्यातून निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या १५ तारखेपासून तीन दिवस काँग्रेसची आढावा बैठक होणार असून त्यात आघाडीने एकदिलाने प्रचार करण्याबाबत ठरेल असे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडीची तयारी आहे पण एमआयएमबरोबर काँग्रेस जाणार नाही, असे ते म्हणाले. मनसेशी आघाडी शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

यवतमाळमध्ये अवनी वाघिणीला सरकारने फेक एन्काऊंटर करून मारले असा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला. पुण्याचे नांव जिजापूर करण्याची मागणी चव्हाण यांनी फेटाळली. विकासाचा मुद्दा फसल्याने मोदी सरकार शहरांची नांवे बदलत आहेत , असे ते म्हणाले.