आता युनिफॉर्म द्वारे सहज ठेवता येईल विद्यार्थ्यांवर लक्ष 

बीजिंग : वृत्तसंस्था – टेक्नॉलॉजी मध्ये जगात चीन उच्च स्थानावर आहे हे सर्वांनाच माहिती आहे हे चीन ने परत एकदा सिद्ध करून दाखवले आहे. लहान मुले कधी कोणता उपद्व्याप करतील हे सांगता येत नाही. ही मुले एकट्याने कुठे जाऊ नयेत, त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी शाळेच्या प्रशासनालाही काळजी घ्यावी लागत असते. आता त्यासाठी चीनच्या शाळांनी चिप असलेले गणवेश बनवले आहेत. या युनिफॉर्मची किंमत 17 पौंड म्हणजे सुमारे 1500 रुपये आहे. त्यावर खांद्याच्या बाजूला एक मायक्रोचिप बसवलेली आहे. ही चिप शाळांच्या फाटकावर लावलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीमने संचालित होते.
चीनने तयार केली जगातील सर्वात मोठी लक्ष ठेवणारी सिस्टिम
चीनने याआधीही अशाप्रकारची सिस्टिम तयार केली होती. त्याअंतर्गत स्काय नेट नावाच्या प्रोजेक्टमध्ये 2 कोटी कॅमेरे बसवण्यात आले होते. या प्रोजेक्ट च्या माध्यमातून फक्त 3 सेकंदात 1.4 अब्ज लोकांना ओळखणे शक्य होते.

 चीनच्या या स्मार्ट युनिफॉर्मला गुइझोउ गुआनयू टेक्नोलॉजीने तयार केले आहे. या स्मार्ट युनिफॉर्ममुळे विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळ स्मार्ट एंट्रन्स सिस्टिममध्ये रेकॉर्ड होणार आहे.

 एंट्रन्स सिस्टिममध्ये बसवलेला कॅमेरा शाळेत विद्यार्थ्यांच्या एंट्री आणि एग्झिटचा 20 सेकांदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल. त्यानंतर तो व्हिडिओ शिक्षक आणि पालकांसाठी तयार केलेल्या अ‍ॅप्लीकेशन |मध्ये अपलोड केला जाईल. जर एखादा विद्यार्थी परवानगीशिवाय शाळेतून बाहेर गेल्यास तातडीने अलार्म वाजू लागेल.
स्मार्ट युनिफॉर्म तयार करण्यासाठी लागले दोन वर्षे
गुआनयू टेक्नोलॉजीला हा स्मार्ट युनिफॉर्म तयार करण्यासाठी जवळपास 2 दोन वर्षे लागले. त्यानंतर चीनने या स्मार्ट युनिफॉर्मला जुलै 2017 मध्ये लाँच केले