मुलींसाठी खुशखबर ! मेकअपसाठी आला आहे थ्रीडी मेकअप प्रिंटर

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था: मेकअप  करायला कोणत्या मुलीला आवडत नाही. मेकअप करायला नको अशी मुलगी क्वचितच पाहायला मिळेल. कारण आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. ज्या सुंदर असतात त्यांना आपण अधिकाधिक सुंदर दिसावं असं वाटत असतं. सध्या  थ्रीडी प्रिंटरचा जमाना आहे हे सर्वांना माहीतच आहे. परंतु मुलींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे की, आता मात्र थ्रीडी मेकअप प्रिंटरही तयार करण्यात आला आहे. या थ्रीडी मेकअप पेनमध्ये इनबिल्ट सेन्सर आहेत. हे सेन्सर पूर्ण अंधारातही चेहरा स्कॅन करू शकतात.
सध्याच्या  जमान्यात चक्‍क मेकअप प्रिंटरही येईल अशी कुणी कल्पनाही केली नसेल परंतु असे असले तरी हा प्रिंटर तयार झाला आहे हे नक्कीच खरे आहे. हा प्रिंटरची खास बात म्हणजे  हा प्रिंटर एखाद्या व्यक्‍तीच्या त्वचेच्या रंगाशी साधर्म्य असणार्‍या रंगाचे फाऊंडेशन उपलब्ध करून देतो.
कशी आहे प्रक्रिया आणि कार्य 
एकदा चेहरा स्कॅन करून झाल्यावर हा पेन ‘बीप’ आवाज करेल आणि त्यात तयार झालेली फाऊंडेशनची शेड प्रिंट करेल.  तुमच्या त्वचेच्या रंगांशी मिळतीजुळती शेड हा पेन प्रिंट करू शकतो कारण या पेनमध्ये स्कीन टोनच्या पंचाहत्तर हजारांहून अधिक शेड असल्याचं समजत आहे. मुलींसाठी हा प्रिंटर खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण दरवेळी नवे फाऊंडेशन घेण्यापेक्षा हा मेकअप प्रिंटर पेन वापरणे सोयीचे ठरणार आहे असे दिसत आहे. यामध्ये  या पोर्टेबल मेकअप प्रिंटरमध्ये आधीच भरलेले फाऊंडेशन कार्टेज आहेत. मुख्य म्हणजे  हे कार्टेज पुन्हा भरण्याची किंवा नवे टाकण्याचीही सोय आहे. महत्त्वाची बाब अशी की, कार्टेज  पुन्हा पुन्हा वापरता येतो. हा मेकअप प्रिंटर  बॅटरीवर चालणारा असून रिचार्जेबल आहे असे समजत आहे.