महत्वाच्या बातम्या

आता नंबर नाही डेबिट, क्रेडिट कार्डसाठी टोकन 

मुंबई : वृत्तसंस्था – आजच्या काळात डेबिट, क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ह्या क्रेडीट कार्डचे जेवढे उपयोग आणि फायदे आहेत तेवढेच त्याचे तोटे देखील आहेत. म्हणजे जर क्रेडीट कार्ड वापरत असताना काही गोष्टींचे भान ठेवले नाही तर तुम्हाला खूप मोठ्या समस्येला समोर जावे लागू शकते. त्यासाठी ही सुविधा अधिक सुरक्षित करण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्ड क्रमांकाऐवजी १६ अंकी टोकन जारी करणार आहे. कार्डाच्या मूळ क्रमांकाऐवजी बँकांनी दिलेले हे टोकन क्रमांक आपण वापरू शकतो.

या कारणामुळे क्रमांकाऐवजी टोकन जारी करणार
कार्डचा कोणी दुरुपयोग केला तर ? पासवर्ड हॅक झाला तर ? अशा शंका-कुशंकांमुळे आपण कार्ड डेटा वेबसाइटवर सेव्ह करणं टाळतो. म्हणूनच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्ड क्रमांकाऐवजी १६ अंकी टोकन जारी करणार आहे. कार्ड च्या मूळ क्रमांकाऐवजी बँकांनी दिलेले हे टोकन क्रमांक देण्यात येईल. हे टोकन प्रत्येक व्यवहारानंतर बदलण्यात येतं त्यामुळे टोकन क्रमांकाचा वापर खूपच सुरक्षित आहे.

फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफएसएसचे पेमेंट्स प्रमुख सुरेश राजगोपालन म्हणाले की, ‘एकदा टोकन मिळाला की तो क्रमांक कार्ड होल्डरशिवाय दुसऱ्या कोणालाही कळत नाही. कार्ड जारी करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यालाही हा क्रमांक माहित नसतो.’

या नव्या नियमामुळे विदेशवारी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रदेशात पर्यटकांना या कार्डांबाबत खूप काळजी घ्यावी लागते. तेथील कार्ड-स्कीमिंग सिंडिकेट्स खूप सक्रीय आहेत. अनेकदा विदेशी संकेतस्थळांवर भारतीय संकेतस्थळांप्रमाणे टू-फॅक्टर-ऑथेन्टिकेशन अनिवार्य नसतं.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या