म्हणून आईने मागितले मुलीच्या लग्नाला पोलीस संरक्षण 

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – कंजार भाट समाजातील मुलीच्या लग्नाला तिच्या आईने पोलीस संरक्षण मागितल्याची घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. मुलीच्या आईने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कंजारभाट समाजातीलच काही मुले लग्नात गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे लग्न निर्विघ्न पार पडण्यासाठी विवाहाला पोलीस संरक्षण देण्यात यावे हि मागणी पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे.

पोलीसांना धक्काबुक्की ; सहायक निरीक्षकाच्या कारवर दगडफेक 

गुरुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पिंपरी चिंचवड मधील एका तरुणीचा विवाह पार पडणार आहे. परंतु कंजारभाट समाजातील या विवाहात कंजारभाट समाजातीलच तरुण गोंधळ घोळण्याच्या तयारीत आहेत. पुढील धोका सत्वर ओळखून वधू मुलीच्या आईने पोलीस आयुक्तांना विनंती अर्ज लिहून विवाह सोहळ्यास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

सदरचा विवाह कंजारभाट पध्द्तीने होणार असून कंजारभाट समाजातीलच काही तरुण त्याच्या सहकार्यासह गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विवाहाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. २०१८ मध्ये पिंपरी चिंचवड परिसरातच कंजारभाट समाजातील विवाह पार पडत असताना जातीतील प्रथा आणि परंपरांना विरोध दर्शवणाऱ्या तरुण तरुणींना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर या समाजातील प्रथांना विरोध करण्यासाठी तरुण तरुणींनी मोठी मोहीमच उभारली आहे.