पुण्यातील पतसंस्था घोटाळा प्रकरणात एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जादा परतवा देण्याचे अमिष दाखवून ठेविदारांकडून कोट्यावधीच्या ठेवी घेऊन त्यांना परतवा न देता फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे आर्थिक व सायबर क्राईमच्या पथकाने कल्याणी नागरी सहकारी पतसंस्थेतील कार्यालयीन कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.

कल्याणी नागरी सहकरी पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करुन ३ कोटी ३० लाख रुपयांचा घोटाळा केला होता. याप्रकरणी राजेश शिवशंकर रुगले यांनी १० मार्च २०१७ मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केलेल्या पैकी एकाला काल अटक केली.

अजय गोविंद भुते, लता दिपकराव मुजूमदार, तेजस धनंजय केदारी, सुप्रिया देविदास फडतरे, अनुजा अंशुमन देव, अनुराधा गणेश पारखी, नितिन सदाशिव चव्हाण, प्रांजली रामचंद्र लांडगे व प्रसाद प्रकाश केदारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यालयीन कर्मचारी नितीन सदाशिव चव्हाण याला काल अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून चव्हाण हा फरार होता.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, आर्थिक व सायबर चे पोलीस उपायुक्त ज्योती प्रीया सिंह, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.जी. पाटील, पोलीस हवालदार महेश निंबाळकर, पोलीस नाईक संदीप करपे यांच्या पथकाने केली.