क्राईम स्टोरी

चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पारगाव (शिंगवे) येथील ‘माळी मळा’ वस्तीवरील कुशाबा पिराजी लोखंडे (वय ८०) यांचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू असून हल्‍ल्यात त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे (वय ७२) गंभीर जखमी झाल्या आहेत. कुशाबा लोखंडे यांच्या घराच्या छ्ताची कौले काढून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला. त्यानंतर झोपलेल्या या वृद्ध जोडप्यावर चोरांनी जोरदार हल्ला चढवला या हल्ल्यात कुशाबा यांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक ग्रामास्थांनी आरडा ओरडा झाला असता घटना स्थळी धाव घेतली आणि त्यानंतर गावातील लोकांनी कुशाबा लोखंडे आणि सुमन लोखंडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात कुशाबा लोखंडे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर सुमन लोखंडे यांच्यावर मंचर येथील सिद्धी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी आंबेगाव तालुक्यातीलच मांदळेवाडी आदक कुटुंबावर चोरट्यांनी अशाच प्रकारे हल्ला करून चोरी केली होती. चोरीचे प्रमाण या भागात वाढल्यामुळे जवळ पासच्या गावात पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. चोरट्यांनी या वृद्ध दांपत्याच्या घरातील पूर्ण ऐवज लुटला आहे. वृद्ध कुशाबा यांच्या छातीवर कुदळीने वार करत चोरांनी त्यांचा खून केला आहे. तर सुमन यांना मारहाण करून त्यांना हि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांचाळे करत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या