भाजपच्या ‘त्या’ अधिवेशनाला नगरमधून जाणार १ हजार कार्यकर्ते

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे १९ व २० जानेवारी रोजी नागपूर येथे राष्ट्रीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात भीम संकल्प २०१९ करण्यात येणार आहे. धिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत, मोर्चाचे राष्टीय अध्यक्ष विनोद सोनकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. अधिवेशन दोन दिवसांचे असून नगरमधून एक हजार कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीचा ‘तो’ सदस्य ४ जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार ! 

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळोखे, जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. बेरड म्हणाले नागपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनाला अनुसूचित जाती मोर्चाचे सुमारे पन्नास हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असून नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होत असलेल्या या अधिवेशनात भीम संकल्प २०१९ करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर चुनाव की तयारी, यावर राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राष्ट्रीय संघटन महामंत्री रामलाल हे संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

दि.२० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय उपाध्यक्ष गौतम दुष्यंत सरकार की उपलब्धिया या विषयावर विचार मांडणार आहेत. त्यानंतर दुपारी दीक्षा भूमीवर जाऊन अभिवादन कार्यक्रम होणार असून दुपारी २ वाजता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.यावेळी बेरड म्हणाले केंदातील मोदी सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात पाच तिर्थ विकसीत करण्याचे ठरविलेले आहे.त्यात चैत्यभूमी, दिक्षाभूमी, अंबावडेनगर, डॉ. बाबासाहेबांचे लंडन येथील घर, दिल्लीचे निवासस्थान विकसीत करण्यात येणार आहे.