हिंजवडीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीक अवर्स’ मध्ये ‘वन-वे’वाहतूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी ही सर्वांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वी ‘गुगलवर हिंजवडी सर्च ‘ केल्यास परत येणे नाही असे येत होते. तर सध्या या वाहतुक कोंडीमुळे आयटी पार्कमधील ५६ कंपन्या स्थलांतर होण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे लगेचच सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन स्वतः यांनी शिवाजी चौकात उभा राहून वाहतुकीची समस्या जाणून घेतली. तसेच काही बदल केले, ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यातून काही वाहतूक बदलाचे पर्याय निवडले. हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीक अवर्समध्ये ‘वनवे’ चा पर्याय प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. तर लक्ष्मी चौक ते भूमकर चौक हाही वन-वे करण्याचा अंदाज वर्तवला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cad7980b-af93-11e8-92c4-7bb71d5a35bc’]

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः चौकात उभा राहून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली. पुण्याकडून हिंजवडीकडे आयटी कंपन्यांमध्ये येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. याचा स्थानिक नागरिकांना सुरुवातीला थोडा त्रास होणार असला तरी याचे दुरगामी परिणाम खूप चांगले असणार आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

जाहिरात

पुणे-हिंजवडी या मार्गावर आज (सोमवारी) दुपारपासून ‘वन-वे’ बाबत काही बदल करण्यात आले होते, या बदलाबाबत पुणे-हिंजवडी या मार्गावर प्रवास करणारे आयटी प्रवासी कार चालक स्वप्नील तळपदे आणि दुचाकी चालक विशाल कुराडे यांना तात्पुरत्या बदलाबाबत आयुक्तांनी विचारले. बदल करण्यात आलेल्या मार्गावरून प्रवास करताना इतर दिवशी पेक्षा वेळ कमी लागल्याचे प्रवाशांनी आयुक्तांना सांगितले.

हिंजवडी फेज तीन ते शिवाजी चौकापर्यंत येण्यासाठी दररोज अर्धा ते पाऊण तास लागतो, परंतु आज वाहतुकीत बदल केल्यामुळे २० ते २५ मिनिटे वेळ कमी लागत असल्याचे वाहन चॉलक म्हणाले.

हिंजवडी वन वे सकाळी आठ ते अकरा या वेळेत पुणे – वाकड गावाकडून हिंजवडी शिवाजी चौक मार्गे हिंजवडी फेज १ मधून एमआयडीसी, फेज 2, फेज 3 कडे वाहतूक वळवली आहे. तर सायंकाळी चार ते सात मार्ग – हिंजवडी एमआयडीसी, फेज 2, फेज 3 कडून शिवाजी चौक मार्गे पुण्याकडे वाहतूक वळवली आहे. स्थानिक नागरिकांसाठी – शिवाजी चौकातून गावठाण मार्गे भूमकरवस्ती हा रस्ता वापरता येणार आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756VRJ25′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1369769-af93-11e8-8c00-57c04b9a2f1a’]

पोलीस आयुक्तांनी हिंजवडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या बदलास विरोध दर्शविला. तसेच सकाळच्या वेळी आठ ते अकरा या वेळेत भूमकर चौक ते लक्ष्मी चौक ‘वनवे’ तर संध्याकाळी चार ते सात या वेळेत लक्ष्मी चौक ते भूमकर चौक ही वाहतूक ‘वनवे’ करण्याची चर्चा झाली. यास आयुक्तांनी सहमती दर्शवली आहे.

जाहिरात