अखेर घटस्थापनेला चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

गेली अनेक वर्षे चर्चा, प्रस्ताव आणि मंजुरी मिळालेल्या चिखली पोलीस ठाणे सुरु करण्यास अखेर मुहूर्त लागला आहे. घटस्थापनेला म्हणजे बुधवारी दि. १० ऑक्टोबर रोजी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’526063a3-cab5-11e8-85bd-3b0842b87f91′]

पुणे ग्रामीण पोलीसांकडे देहूरोड पोलीस ठाणे असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता चिखली आणि साने चौकाचा भाग निगडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. यामुळे निगडी पोलीस ठाण्याची हद्द मोठी झाली. पुणे पोलीस आयुक्तालयातुन जादा मनुष्यबळ देण्यात आले. तसेच एक पोलीस निरीक्षकही वाढवण्यात आला. तरीही निगडीची हद्द मोठीच राहिली. यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी चिखली पोलीस ठाणे स्वतंत्र करण्याचे ठरवले. तसे प्रस्ताव दिले. शासनाकडून मंजुरी मिळवली. याला सुमारे दोन वर्षे होत आलेली आहेत. मनुष्यबळ मंजूर करण्यात आले.तरी देखील अद्याप पोलीस ठाणे चालू होऊ शकले नाही.

सांगलीत ‘स्वाईन’ने महिलेचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट रोजी सुरू झाले. त्यानंतर शहरात मोठ्या हालचाली सुरू झाल्या. पोलीस आयुक्त आर.के. पद्मानाभन यांनी नुकत्याच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये चिखलीसाठी वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांची नियुक्ती केली. तर निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे हे आहेत. मुगळीकर यांनी कार्यकालाचे कामकाज पूर्ण करून घेतले. दरम्यान पोलीस ठाण्यासाठी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केली आहे. त्यामुळे येत्या बुधवारी पालकमंत्री बापट यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त पद्मानाभन यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’abc6bdee-cab5-11e8-9609-0ddbe87ae9f2′]