मेट्रो मार्गिकेच्या परिसरात चार एफएसआय बांधकाम परवानी देण्यास स्वंयसेवी संस्थांचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  

पीएमआरडीए आणि महामेट्रोच्या मेट्रो मार्गीकेच्या परिसरात बांधकांमांना चार चटई निर्देशांकापर्यंत (एफएसआय) परवानगी देण्यास स्वंयसेवी संस्थांनी विरोध दर्शविला आहे. मुळातच ही मागणी करताना पीएमआरडीए अथवा महापालिका प्रशासनाने कुठलाही अभ्यास केलेला नाही. यानंतरही केवळ प्रवासी मिळावेत यासाठी ही एफएसआयची मागणी झाल्यास भविष्यात शहराची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढणार असून महापालिकेच्या भौतिक सुविधा हा ताण सहन करू शकणार नाहीत, असा दावा या संस्थांनी केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d15985ea-c928-11e8-8b5d-3d2ad75bb126′]

ग्रीन मुव्हमेंट अंतर्गत या विरोधात चळवळ सुरू केलेल्या खासदार ऍड. वंदना चव्हाण, अनिता बेनींजर, रामचंद्र गोहाड, सारंग यादवाडकर, सतिश खोत आणि विवेक वेलणकर यांनी  आज पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ऍड. वंदना चव्हाण म्हणाल्या, की शहरातील सार्वजनिक वाहतूक सुविधा निर्माण झाली पाहीजे, यामध्ये कोणाचेही दुमत नाही. परंतू पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ कि.मी.च्या मार्गीकेवर बांधकामांना चार एफएसआय देण्याची मागणी केली आहे. या मार्गावरील मेट्रोला प्रवासी उपलब्ध व्हावेत, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. परंतू केवळ प्रवाशांसाठी चार एफएसआय दिल्यास येत्या काही वर्षात या परिसरातीलच नव्हे तर ज्या ठिकाणी मेट्रो मार्ग होणार आहेत, त्या परिसरातील लोकसंख्या भरमसाठ वाढणार आहे. याचा ताण पाणी, कचरा, आरोग्य यासारख्या सुविधांवर येणार आहे. त्यामुळे सरसकट मार्गीकेच्या दोन्ही बाजूच्या बांधकामांना वाढीव एफएसआय देण्याऐवजी मेट्रो स्टेशनच्या परिसरात अगदी लगतच्या क्षेत्राला हा एफएसआय देण्यात यावा. यामुळे स्टेशन परिसरात पार्किंग व अन्य नागरी सुविधा निर्माण होण्यास मदत होईल.

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे तिहेरी खून

अनिता बेनींजर म्हणाल्या, की महापालिकेने मेट्रो स्टेशनच्या दोन्ही बाजूला ८०० मी. परिसरात तेथील रस्त्यांच्या रुंदीप्रमाणे अडीच ते चार एफएसआय देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार आम्ही हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गीकेचा अभ्यास केला. २३ कि.मी.च्या या मार्गीकेवर २३ स्थानके आहेत. दोन स्थानकांमधील अंतर साधारण १.६ कि.मी.चे आहे. महापालिकेच्या या प्रस्तावाचा अभ्यास केला तर यामध्ये बहुतांश मार्गीकेच्या परिसरातील बांधकामांना एफएसआय द्यावा लागणार आहे. यामुळे येथील लोकसंख्येची घनता प्रति हेक्टर ६४० च्या आसपास होईल. सध्या शहरात हीच घनता १०२ इतकी आहे. याचाच अर्थ साधारण या मार्गीकेवर मेट्रो चालविण्यासाठी शहराच्या सध्याच्या लोकसंख्येइतकीच अर्थात आणखी ३५ लाख लोकसंख्या व्हावी लागेल. साधारण ७० लाख लोकसंख्येसाठी आजच्या दुप्पट पाण्याची गरज भासेल. तसेच इतर सुविधा तर वेगळ्यास एवढ्या पाण्याचा पुरवठा शक्य आहे? हा खरा प्रश्‍न आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0e4685e-c928-11e8-a78d-f7bf2a0da734′]

दुसरे हिंजवडीतून शिवाजीनगरपर्यंत येणार्‍या नागरिकांची संख्या ही जेमतेम १८ टक्के आहे. हिंजवडीतील बहुतांश कर्मचारी वाकड, बावधन, बाणेर परिसरात राहातात. तसेच या मेट्रो मार्गीकेवर बहुतांश भागात केंद्र आणि राज्य शासनाची कार्यालये आणि शासकिय जमिनी आहेत. त्याठिकाणी चार एफएसआयचा वापर करण्यासाठी डेव्हलमेंट केली जाणार का, हा देखिल प्रश्‍न आहे. एफएसआयचा प्रस्ताव देताना याचा अभ्यास केलेला नाही, हे यातून उघड होते. त्यामुळे मेट्रो प्रकल्प हा आहे त्या नागरिकांना सहज सुविधा पुरविण्यासाठी आहे की प्रवासी मिळावेत यासाठी लोकसंख्या वाढावी यासाठी आहे, हा प्रश्‍न पडतो.