ट्विटरवर दहशतवादी हल्ल्यावरुन सरकारला लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे १८ जवान शहीद झाले आहेत. त्याच प्रमाणे २० जवान जखमी झाले आहेत.  जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या भीषण हल्ल्या नंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोदी सरकारला चांगलेच लक्ष केले जाते आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांचे ट्विट
आज पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेद करतो. त्या जवानांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या परिवाराच्या त्यागाची मिसाल या देशासमोर ठेवली आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो. तसेच उरी, पठानकोट, पुलवामा हि दहशतवादी हल्ल्यांची यादी हि मोदी सरकारच्या काळात देशाच्या सुरक्षेच्या अपयशाची यादी आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विट
जम्मू काश्मीर मधील अवंतिपुरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मला धक्का बसला आहे. त्या ठिकाणी लष्कराचे १८ जवान शहीद झाले आहेत. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. सर्वच जवानाच्या कटुंबांसोबत आमची सहानभूती आहे असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे.

माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचे ट्विट
घाटी कडून एक भयंकर बातमी आम्हाला मिळाली आहे. तिथे अनेक जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेद करतो आणि हल्लात शहीद झालेल्या जवानांच्या प्रति शोक व्यक्त करतो.

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे ट्विट
अवंतीपुरा भागाकडून अत्यंत खळबळजनक बातम्या येत आहेत. त्यात भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जखमी झाले आहेत त्या शहीद जवानांच्या प्रति आम्ही शोक व्यक्त करतो. तसेच हा हल्ल्याचा निषेद करतो.