हॉलिवूडचे प्रसिध्‍द अभिनेते अल्बर्ट फिनी यांचे निधन 

दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूडचे प्रसिध्‍द ब्रिटिश अभिनेते अल्बर्ट फिनी यांचे वयाच्‍या ८२ व्‍या वर्षी निधन झाले आहे. गेली ८ वर्ष फिनी किडनीच्‍या कॅन्‍सरने पीडित होते. अल्‍बर्ट यांच्‍या मृत्‍यूची पुष्टी त्‍यांच्‍या प्रवक्‍त्‍याने दिली आहे. अल्बर्ट यांनी ६० हून अधिक चित्रपटात काम केले होते.

अल्‍बर्ट फिनी यांचा जन्म १९३६ मध्‍ये सॅल्फोर्ड येथे झाला होता. त्‍यांचे वडील बुक मेकर होते. अभिनेता होण्यासाठी अल्‍बर्ट यांना  त्‍यांच्‍या शाळेच्‍या हेडमास्‍तरांनी प्रेरित केले होते. १९६० मध्‍ये आलेला चित्रपट ‘सॅटरडे नाईट ॲण्‍ड संडे मॉर्निंग’ मधून अल्‍बर्ट यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्‍यांची मुख्‍य भूमिका होती.

सिनेमाजगतात अल्‍बर्ट यांना ओरिजनल यंग मॅन म्‍हणून ओळखले जायचे. चित्रपटाशिवाय  त्यांना नाटकात अभिनय करायला आवडायचे त्‍यांनी शेक्सपीयरच्या अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. अल्‍बर्ट चार वेळा ऑस्कर ॲवॉर्डसाठी नॉमिनेट झाले होते. द टॉम जोन्स, मर्डर ऑन द ऑरिएंट एक्सप्रेस, द ड्रेसर आणि अंडर द वॉल्कानो यासाठी त्‍यांना ॲवॉर्ड मिळाले आहेत.