नगरमधील आणखी एक नगरसेवक आरोपीच्या पिंजर्‍यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वंजारगल्ली येथील दंगलीनंतर रात्री पुन्हा एकदा नगरमध्ये दोन गटात दंगा झाला. जुना वाद व महापालिका निवडणुकीतील वादातून नगरसेवक मुजाहिद उर्फ भा कुरेशी व पराभूत उमेदवार गयाज कुरेशी यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. नालबंद चौकात मध्यरात्रीच्या सुमारास तलवार, गुप्ती, लोखंडी गज, लाकडी दांडके या शस्त्राने तुफान हाणामारी झाली. हाणामारीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असताना दोन गटांत तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे व तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालयात आपसांत भांडण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुजाहिद उर्फ भा कुरेशी व गयाज कुरेशी या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. त्यातून त्यांच्यात अधूनमधून वाद होत असतात. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नालबंद चौकात त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. या वादातून त्यांनी एकमेकांवर तलवार, गुप्ती, चोपर, लाकडी दांडके, लोखंडी गजाने तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत सहा ते सात जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही गटाचे जखमी एकाच ठिकाणी आल्यामुळे रुग्णालयातही त्यांच्यातील वाद उफाळून आला. मध्यरात्री साडेबारा वाजता रुग्णालय परिसरातच दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपले त्यांनी हाणामारी सुरू केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

या दोन घटनांमुळे शहरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलासह मोठा पोलिस फौजफाटा नालबंद परिसरात तैनात करण्यात आला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका गटाच्या फिर्यादीवरून खुनाचा प्रयत्न केल्याचा, तर दुसऱ्या गटाच्या फिर्यादीवरून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात झालेल्या वादाबाबत सहाय्यक फौजदार जाधव यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाग कुरेशी याने गयाज पुरेशी याचा दारुण पराभव केला होता. वंजारगल्‍ली येथील दंगलीत नगरसेवक मुदस्सर शेख यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले. आता दोनच दिवसात आणखी एका नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.