वन्य प्राण्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस कर्मचारी जखमी

बाभूळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पांढरकवडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्माचारी कार अपघातात जखमी झाला. कार समोर अचानक वन्य प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस कर्मचाऱ्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. ही घटना आज (सोमवार) यवतमाळ-अमरावती रोडवरील मिटनापूर येथे घडली. अनिलसिंह गौतम (वय-५५) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अनिलसिंह गौतम हे आपल्या कारने (एम.एच.२७ एआर ६२७२) यवतमाळ येथून अमरावतीकडे जात होते. मिटनापूर जवळ रस्त्यावरून आडव्या जाणाऱ्या वन्यप्राण्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. यात अनिलसिंह गौतम जखमी झाले. त्यांना स्टेअरिंगचा मार लागला असून त्यांना ग्रामीण रुग्णालय व नंतर यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
बाभूळगाव, नांदुरा (बु), वीरखेड, वाटखेड, फाळेगाव, थाळेगाव आदी गावांजवळ नेहमी वन्यप्राण्यांमुळे अपघात घडत आहे.

ठाणेदार गौतम यांनी प्रसंगावधान राखून एअर बॅग उघडल्यामुळे सुदैवाने ते बचावले. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघात झाला त्यावेळी ते स्वत: कार चालवित होते.