मनोरंजन

‘थॉर’ सोबत हॉलिवूड चित्रपटात दिसणार ‘हा’ अभिनेता 

मुंबई : वृत्तसंस्था – अ‍ॅव्हेंजर फेम अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ सध्या ढाका या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नोव्हेंबर महिन्यात तो भारतात आला होता. मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी हे शुटिंग झाले होते. या चित्रपटात ख्रिस सोबत बॉलिवूडचे काही कलाकारही झळकणार आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविल्यानंतर ख्रिससोबत अभिनेता पंकज त्रिपाठी त्याच्या या चित्रपटात दिसणार आहे. या  चित्रपटात पंकज त्रिपाठी ची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. पंकजसोबत याचित्रपटात रणदीप हुडा आणि मनोज वाजपेयी सारखे कलाकारही दिसून येणार आहे. या चित्रपटातून पंकज हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. बँकॉक आणि थायलँड या ठिकाणी या सिनेमाचे चित्रीकरण होणार असल्याचेही समजले आहे. दिग्दर्शक सॅम हारग्रेव्ह याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लवकरच पंकज त्रिपाठी बँकॉकमध्ये दाखल होणार असल्याचे ही कळले आहे. चित्रपटाच्या पुढील भागाचे शूटिंग थायलंडमध्ये होणार आहे. ढाका हा थरारपट असून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. लवकरच  पंकज त्रिपाठी कबीर खान यांच्या ‘८३’ चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. पंकज त्रिपाठी आतापर्यंत फुकरे, फुकरे रिटर्न, आक्रोश, आरक्षण, दिलवाले यांसारख्या चित्रपटात दिसून आले होते. आता हॉलिवूडमधलं हे पदार्पण त्यांच्यासाठी कस ठरणार आहे. हे लवकरच कळेल.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या