दहशतवाद नष्ट करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र यावे : पंकजा मुंडे

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. त्याचा देशात सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. दहशतवादाने जगाला पोखरणे सुरु केले आहे. दहशतवाद ही जगाला लागलेली कीड असून ही कीड कर्करोगासारखी आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जगातील सर्व शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले. राजबाग लोणी काळभोर येथील तिसऱ्या ”पसोर्ना टेक्नो कल्चरल फेस्ट – २०१९” च्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या.

जगात फोफावत चाललेला दहशतवाद ही मोठी समस्या बनत चालली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याने अत्यंत दु:ख झाले. याची मी निंदा करते. शहीद जवानांच्या परिवाराच्या दु:खात सरकार सहभागी आहे. आपल्या मुलांना सैनेत पाठविण्यासाठी धैर्य लागते, ते शहीद झालेल्या जवानांच्या आई आणि पत्नीने दाखविले, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पाथ ब्रेकिंग व्यावसायिक ऑफ पसोर्ना पुरस्काराने बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनमंत गायकवाड यांना तर मेलॉडिक पसोर्ना ऑफ एमिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसंच प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड यांना, करिश्माई नेता पुरस्काराने पंकजा मुंडे यांना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, आंतकवाद हा कर्करोगासारखा आजार आहे. त्याला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आगामी काळात विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी हे घुमट काम करेल. सर्वांना हक्क आणि ताकद देण्याचे काम होते. लवकरच भारत हा जगातील सर्वशक्तीशाली देश बनेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच एमआयटीने दिलेल्या या पुरस्कारने सर्वांगीण कार्य ताकदीने करण्याची हिंमत दिली आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.