उदयनराजेंच्या उमेदवारीला ‘यांचा’ विरोध

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी आज थेट बारामती गाठत खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध व्यक्त करत त्यांचे काम न करण्याचा निधार केला आहे. असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना स्पष्ट सांगून टाकले. त्यामुळे खासदार यांच्या विरोधातील राष्ट्रवादी अंतर्गत मोर्चे बांधणीने पुन्हा धार पकडल्याचे मानले जात आहे आजच्या परस्थितीला जिल्ह्यातील राजकारण बदल्याण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार एक-एक मतदारसंघाचा तिढा सोडवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या मार्गावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वत:च्या उमेदवारीतून त्यांनी माढ्याचा मतदारसंघ सुरक्षित केला. कोल्हापूरच्या उमेदवारीबाबात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. पण साताऱ्यातील लोकसभेच्या जागे बाबत त्यांनी अद्याप निर्णंय घेतला नाही. साताऱ्यातील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांचा उदयनराजेंना विरोध आहे. त्याला कारणीभूत राजेच आहे. त्यामुळे उदयनराजेंना होणारा विराेध दूर करण्यासाठी त्यांनी स्वत: काही पावले टाकली. त्यातून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंना एकाच गाडीत त्यांनी बसविण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या या प्रयत्नानंतरही जिल्ह्यात अद्याप उदयनराजेंच्या भूमिकेबाबत अद्याप सकारात्मकता आलेली दिसत नाही. शरद पवार माढ्यातून उभे राहण्याची चर्चा सुरू असतानाच विधान परिषदेचे सभापती रामजे नाईक-निंबाळकर व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पवार साहेब यांना साताऱ्यातून उभे राहण्याचे आमत्रंण दिले. देशात सर्वाधिक मतांनी विजय करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यातूनच उदयनराजेंच्या विरोधातील भूमिका स्पष्ट होत होती. त्यामुळे उदयनराजे विरोधाला पुन्हा सुरूवात झालेली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या सातारा तालुक्यातून विविध पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बारामतीला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी उदयनराजेंनी आजवर केलेल्या पक्षविरोधी कृतींचा, घेतलेल्या भूमिकांचा पाढा वाचला. राजेंच्या उमेदवारी बद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

उदयनराजेंना साताऱ्यातून उमेदवारी दिली, तरी आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, असे शरद पवार यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. इतकेच काय शिवेंद्रसिंहराजेंनी काम केले, त्यांनी काम करण्यास सांगितले तरी आम्ही उदयनराजेंचे काम करणार नाही, असे या शिष्टमंडाळामध्ये अजिंक्यताराचे माजी संचालक लालासाहेब पवार,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे साताऱ्याच्या उमेदवारीबाबत पक्षाध्यक्षां समोर पुन्हा समस्या निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत आहेत.