पतित पावनचा हेल्मेट एल्गार : पुणेकरांचे घेतले मतदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणेकरांना हेल्मेट सक्ती नको असे पतित पावन संघटनेने घेतलेल्या जनमताच्या कौलातुन स्पष्ट झाले आहे. संघटनेने शहरात पाच ठिकाणी हेल्मेट सक्ती वर मतदान घेतले होते. त्याची मतमोजणी पत्रकार भवन येथे पार पडली.

या मतमोजणीचा निकाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. या जनमत कौलामध्ये 4 हजार 7 पुणेकरांनी मतदान केले. माॅर्डन महाविद्यालय, भारती विद्यापीठ – कोथरूड, मंडई, वाडीया महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय येथे हे मतदान घेण्यात आले. यामध्ये 2838 जणांनी हेल्मेट सक्तीच्या विरोधात मतदान केले. 1179 जणांनी हेल्मेट सक्ती च्या बाजूने कौल दिला. 98मते बाद झाली.

शहरात दुचाकी स्वारांना हेल्मेट अनिवार्य केले आहे

वाहतुक पोलिस हेल्मेट न वापरणाऱ्यांना दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. हेल्मेट सक्ती हा विषय गेल्या पंधरा वर्षांपासून शहरात वादाचा ठरत आहे. सातत्याने हेल्मेट सक्ती आणि त्यास विरोध केला जात आहे. याबाबत पुणेकरांची नेमकी भावना काय हे जाणून घेण्यासाठी मतदान घेण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.