तर पवारांची बारामतीही जिंकू : गिरीश महाजन 

जळगाव : वृत्तसंस्था – मागील पाच वर्षात चांगले चांगले साफ झाले आहे. मायक्रो मॅनेजमेंट केले तर काहीच कठीण नाही. त्यामुळे पक्षाने जबाबदारी दिल्यास पवारांची बारामतीही जिंकू असे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

“बारामतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे आजपर्यंत कुणाला तिथे विजय मिळवणे शक्य झाले नाही, यावर बोलताना महाजन म्हणाले “तसं बघायला गेलं तर जळगाव, नगर, धुळ्यात आमचंही वर्चस्व नव्हतं. गेल्या पाच सहा वर्षात चांगले चांगले वर्चस्व साफ झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आधी कुणाचं अस्तित्व होतं, पुण्यात कुणाचं वर्चस्व होतं. सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.

परंतु, राष्ट्रवादीकडे एक सुद्धा महापालिका राहिली नाही. पुणे जिल्हा कुणाचा होता अजित पवारांचाच होता. कुठे काय राहिलं त्यांचं? त्यामुळे बारामतीत आमचं काही नाही, असं म्हणण्याचं कारणच नाही. बारामतीत आमचे उमेदवारही निवडून आले असल्याचे त्यांनी सांगितले.”

गिरीश महाजन यांनी केलेल्य या वक्तव्यबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, “आमचे मित्र आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार बाबूजी विश्वनाथ जैन यांनी आपल्या भाषणात ते म्हणाले होते, “तुम्ही एका मागून एक जिल्हे काबीज करत आहात. तुमच्यात अशी कोणती शक्ती आहे?, असा सवाल त्यांनी केला होता.

त्यावर मी म्हटलं होतं की, पालघर, जळगाव,धुळे, नाशिक आणि आता नगर असेल तिथे आम्हाला विजय मिळवणे कठीण झाले नाही. चांगले नियोजन केले तर कुठल्याही शहरात निवडणूक जिंकणे अवघड नाही. म्हणून ती बारामती जरी असली तरी ते कठीण नाही.”