वाघोलीत वाहातुकीचा उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली, ता-हवेली येथे मंगळवारच्या आठवडे बाजारामुळे नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे आठवडे बाजारात विरुध्द दिशेन येणे, कुठेही वाहन पार्कींगचे प्रमाण वाढत असते. यावरती लोणीकंद पोलीसांच्या वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात विरुध्द दिशेने वाहन चालवून वाहतूक शिस्त व नियमांचा भंग करणाऱ्या २० वाहनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

वाघोली येथे पुणे नगर महामार्गालगत परिसरातील मोठा आठवडे बाजार भरत असतो. यावेळी परिसरातील अंदाजे १० हजार नागरिक बाजारहाट व आपल्या वस्तुची खरेदी-विक्री करण्यासाठी येत असतात. महामार्गालगत आणि इतर अंतर्गत रस्तालगत विक्रेते आपली दुकाने थाटतात त्यामुळे येणारे अनेक ग्राहक आपल्या वाहनावर थांबूनच मालाची खरेदी करतात. तर अनेक जण आपली वाहने मार्गालगत उभी करुन खरेदीला जातात. त्याच बरोबर बाजाराच्या निमित्ताने माल व प्रवाशी वाहतूक करणारी खाजगी वाहने रस्तावर उभी राहिल्याने वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होतो. वेळप्रसंगी वाहतूक कर्मचारी वाहतुक शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असततात,परंतु काहीवेळा स्थानिक बेशिस्त वाहन चालक वाहतूक कर्मचाऱ्यांचं अरेरावीची भाषाही वापरतात.

आजच्या कारवाईत केसनंद फाटा ते वाघेश्वर चौका दरम्यान विरुध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल,पोलिस नाईक गणेश शेंडे,बाळकृष्ण वाडेकर,अभिजीत कांबळे,पोलीस शिपाई निलेश जाधव,दत्ताञय मोरे,विशाल कोथळकर,अमोल दांडगे,संतोष ढोपरे व सहकाऱ्यांनी केली.

लोणीकंद पोलीस स्टेशनच्यावतीने आवहान करण्यात येते की,वाहनचालकांनी आपली वाहने चालवताना रस्ताच्या सरळ दिशेनेच चालवावीत. कोणीही विरुध्द दिशेने आपली वाहने चालवू नये महामार्गालगत,अंतर्गत रस्तावर व दुकानांसमोर कोणीही सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होईल अशी बेजबाबदारपणे वाहने पार्क करु नये. अन्यथा संबंधीत वाहनावरती व वाहन चालकावरती पोलीसांच्यावतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सुधीर तोरडमल,सहाय्यक पोलीस निरिक्षक,वाहतूक विभाग,लोणीकंद पोलीस स्टेशन.