हेल्मेटविना केले ‘लव्हरात्री’ चे प्रमोशन, अभिनेता आयुष शर्माला दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सलमान खान निर्मित ‘लव्हरात्री ‘ सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम ‘लव्हरात्री’ सिनेमाच्या च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  गुजरातमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यात गुजरात मध्ये लाव्हरात्री टीम ने स्कूटरवरुन सिनेमाचं प्रमोशन  केले. पण यावेळी अभिनेता आयुष शर्मा हेल्मेट घालायचे विसरला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला दंड ठोठावला आहे. यावरून सेलिब्रेटी असो वा आणखी कुणी वाहतुकीचे नियम सर्वाना सारखेच असतात याची प्रचिती पोलिसांनी यावेळी दाखवून दिली आहे.
[amazon_link asins=’B077RV8CCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a6814b2-9fb0-11e8-9550-9bc0ae61e3f6′]

‘लव्हरात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्माला वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला. स्कूटरवरुन सिनेमाचं प्रमोशन करताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे पावती फाडण्यात आली.

गुजरातमध्ये बडोद्यातील रस्त्यांवर ‘लव्हरात्री’ चित्रपटाची टीम प्रमोशन करत होती. यामध्ये अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन यांचाही समावेश होता. त्यावेळी दुचाकीस्वार असलेल्या एकानेही हेल्मेट घातलं नव्हतं. एककीडे आयुष-वरिनाचे चाहते त्यांच्यामागे पळत होते, तर दुसरीकडे काही जागरुक नागरिकांनी ते हेल्मेटविना प्रवास करत असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट केलं. वाहतूक पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत लव्हरात्री टीमला अडवलं आणि प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड ठोठावला.
[amazon_link asins=’B01DU5OJCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’416504f6-9fb0-11e8-8e4e-41bafbf3068f’]

सलमानच्या पावलावर पाऊल ठेवत आयुष शर्मा सिनेसृष्टीत येत आहे, तसं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसवत आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेता कुणाल खेमूला विदाऊट हेल्मेट पकडून पोलिसांनी ई-चलन बजावलं होतं. त्याचप्रमाणे ट्राफिकमध्ये अडकलेल्या वरुण धवनने चाहत्यांसोबत भर रस्त्यात सेल्फी काढल्याने पोलिसांनी त्यालाही समज दिली होती.