क्राईम स्टोरी

पार्किंगच्या वादावरून व्यापाऱ्याला ‘दाभणाने’ भोकसले  

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या किरडपूरा परिसरातील दरबार हॉटेल नजीक असणाऱ्या किराणा दुकानचालकाने दुकानासमोर दुचाकी लावण्यास काही तरुणांना नकार दिला. दुकानदाराने दिलेल्या नाकाराचा राग मनात धरत या तरुणांनी व्यापाऱ्यावर धारदार कात्री त्याचबरोबर दाभणाने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली.
हा होता वाद…
औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात किरडपुरा परिसरात समदखान अहमद खान यांचे दुकान आहे. या दुकानासमोर काही तरुण आले ते तेथे दुचाकी उभी करत असतांना समदखान त्या तरुणांना विनंतीपूर्वक म्हणाले की इथे गाडी उभी करण्याची जागा नाही आपण दुसरीकडे गाडी उभी कारवी. या दरम्यान तरुणांनी  खान यांच्याशी हुज्जत घातली दोघांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली. यानंतर जमीर पटेल आणि नुमान पटेल या दोघांनी खान यांच्यावर कात्री आणि दाभणाने हल्ला केला. या हल्ल्यात गंबीर जखमी अवस्थेत खान रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले.
या घटनेची माहिती मिळताच सादर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थाळी दाखल झाले. स्थानिकांनी खान यांना सरकारी दवाखान्यात (घाटी ) उपचारासाठी  दाखल केले परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या