दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या पीएचडी स्कॉलरचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था

दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या पीएचडी स्काॅलरचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनन बशीर वाणी असं या काश्मिरी तरुणाचं नाव आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील पीएचडी शिक्षण अर्धवट सोडून हा तरुण दहशतवादाच्या वाटेवर गेल्याचे समोर येत आहे.  मनन बशीर वाणी या काश्मिरी तरुणाने ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता. कूपवाडा जिल्ह्यातील हंडवारामध्ये एसओजी आणि सैन्य दलातील 30 राष्ट्रीय रायफल गटाच्या जवानांची गुरुवारी धुमश्चक्री झाली. यामध्ये मनन बशीर वाणी आणि आशिक हुसैन झरगर या दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88ffee9a-ce11-11e8-9dad-e1bfe8b466be’]

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पीएचडी स्कॉलर असून त्याचे वय 26 वर्षे आहे.  मनन बशीर वाणी एका उच्चशिक्षित कुटुंबात जन्माला आला. त्याचे वडील लेक्चरर आहेत, तर भाऊ अभियंता आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात मननने विद्यापीठातून सुट्टी घेतली होती, मात्र घरी जाण्याऐवजी त्याने ‘हिजबुल मुजाहिद्दीन’मध्ये प्रवेश केला. दहशतवादी संघटनेत प्रवेश करणारा तो पहिलाच पीएचडीचं शिक्षण घेणारा काश्मिरी विद्यार्थी होता. कूपवाड्यात झालेल्या चकमकीत पोलिसांनी दहशतवादी मनन वाणीला कंठस्नान घातलं.

मननने हातात रायफल घेतलेला एक फोटो पाच जानेवारीला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यावेळी, हादरलेल्या कुटुंबाने मननला घरी परतण्याचं आवाहन केलं होतं. मननच्या मृत्यूनंतर जम्मू आणि काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट केलं आहे. एका पीएचडी स्कॉलरने जीवनाऐवजी मृत्यूची निवड केली. दररोज तरुण सुशिक्षित विद्यार्थी गमवावे लागणं, हे आमचं नुकसान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89a64e22-ce16-11e8-9af2-d352dfbbc393′]