LIC देणार ग्राहकाला ‘ही’ नवीन सुविधा 

मुंबई : वृत्तसंस्था – १ मार्च २०१९ पासून एलआयसी डिजिटल होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला नसेत तर तो तात्काळ करा. एलआयसी सध्या आपल्या ग्राहकांना एसएमएस द्वारे यासंबंधीची माहिती देत आहे.

१ मार्च २०१९ पासून एलआयसी प्रत्येक प्रीमियर होल्डरला पाॅलिसीची माहिती एसएमएस द्वारे देणार आहे. त्यासाठी तुमची एलआयसी मॅच्युअर झाली असेल तर अजिबात वेळ न दवडता एक काम तुम्हाला करायला हवे, नाही तर तुमचे सगळे पैसे अडकून राहण्याची शक्यता आहे. असे अनेक जण आहेत त्यांनी एलआयसी पाॅलिसी बँक खात्याला जोडली नाहीय. त्यांचं पेमेंट एलआयसीनं थांबवलंय.

हे ही वाचा – SBI कडून व्हॅलेंटाइन्स डेला (Valentine day) ग्राहकांना अनोखं गिफ्ट

असे जोडा तुमचे बॅंक अकाउंट –

बँक अकाऊंट जोडणं अगदी सोपं आहे. तुम्ही एक कॅन्सल चेक किंवा पासबुकाच्या फ्रंट पेजची झेराॅक्स घेऊन एलआयसी ब्रॅंचमध्ये जा. तिथे एनइएफटी मँडेट फाॅर्म भरा. त्याला तुम्ही कॅन्सल चेक किंवा पासबुकच्या फ्रंट पेजची झेराॅक्स जोडा. त्यानंतर एक आठवड्यांनी खात्याचा नंबर एलआयसीला जोडला जाईल आणि पैसे थेट खात्यात येतील.
तुम्हाला एसएमएस आला तर समजा तुमचा नंबर रजिस्टर्ड आहे. पण तसे नसेल तर तो रजिस्टर्ड करून घ्यावा लागेल. एलआयसी ग्राहकांना पाॅलिसीचा प्रीमियर कधी द्यावा लागेल. शेवटची तारीख काय आहे. असा SMS तुम्हाला पाठवला जाईल. तुमचा फोन नंबर रजिस्टर्ड नसेल तर तुमच्या एजंटशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी www.licindia.in या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच 022-68276827 यावर संपर्क करा.