फुले वेचिता   …. लता मंगेशकर 

पोलीसनामा ऑनलाईन
जवळपास सहा दशकं आपल्या आवाजाने २० भारतीय भाषांमध्ये ५० हजारहून अधिक गाणी गाऊन ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ असणाऱ्या तसेच  भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज ८९ वा वाढदिवस.
त्यानिमित्तानं खुद्द लतादीदींनी लिहिलेल्या’  ‘फुले वेचिता’ या पुस्तकामधील वडिलांविषयी लिहलेल्या आठवणींचा काही भाग –
१ ) ग्लोब टॉकीजमध्ये स्पर्धा होत्या. खूप स्पर्धक होते. पुढे जाऊन परीक्षकांना आपले नाव सांगायचे, मग गाणी म्हणायची असे ठरलेले होते.
मी पुढे झाले आणि धिटाईने म्हटले, ‘मी, लता दीनानाथ मंगेशकर’ अन श्रोत्यांतून टाळ्यांचा कडकडाट झाला. मी माझ्या बाबांची मुलगी आहे, याचा अभिमान त्याक्षणी मनात फुलून आला. नव्हे, कळायला लागल्यापासून माझ्या वडलांच्या बाबतीत नेहमी मला एक अभिमान, गौरव वाटत आलेला आहे. त्याक्षणी ती भावना पुन्हा मनात ताठपणे उभी राहिली. मी दोन गाणी म्हटली आणि मा. दीनानाथ मंगेशकरांची मुलगी पहिला नंबर घेऊन घरी आली. छातीवर लखलखणारी चांदीची पदके आणि बक्षीस मिळालेला दिलरुबा. त्यानंतर केव्हाही गाताना, नकळतसुद्धा, मा. दीनानाथांच्या प्रतिष्ठेचे भान ढळले नाही.
[amazon_link asins=’B07DFYL91P,B013I23W0G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2f6981f-c306-11e8-84ad-019221115a4f’]
२ ) पोरवयातल्या आमच्या डोळ्यांवर गाढ झोप आहे. बाबानी तंबोरा लावला आहे. त्यांनी लावलेल्या स्वरांनी आमची पहाट उजाडली आहे. त्यांच्या आवाजात आवाज मिसळून गेला आहे ; हे दृश्य अजूनही पुसले जात नाही. बाबांना जाऊन ४६ वर्षांचा, केवढा दीर्घकाळ उलटला आहे, तरीही बाबांची पहिली पुण्यतिथी, बाबांशिवाय काढलेले किती विचित्र दिवस, पुण्यातील आमचं वास्तव्य संपवून आम्ही कोल्हापूरला आलो ; त्यांच्या मायेच्या उबेतून थेट रस्त्यावरच्या उन्हात !
माझा संघर्षाचा काळ थोडा होता, मग उदंड नाव झाले. माझ्या वडिलांवर नियतीने मात्र अन्याय केला.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b9047fc5-c306-11e8-bb17-ebc1de6472cd’]
B
३ ) बाबा, तुम्ही मला म्हटलं होतं ना, ही मोठी मुलगी सर्वांना सांभाळेल म्हणून, तुमचे शब्द मी खरे करावे यासाठी उदंड पुण्याई मला दिलीय ; म्हणूनच आज येथपर्यंत आले. तुमची मुले स्वतःच्या हिमतीने पुढे आली आहेत. त्यांच्या पंखात बळ आले आहे. तुमची आशा तर भारतातली मोठी गायिका आहे. मीना गुणी संगीतकार, उषा मोठी चित्रकार व गायिका अन हृदयनाथ प्रतिभावंत संगीतकार. तृप्त मनाने वृद्द डोळ्यांनी माई सारे पाहतेय.

कोर्टानं ‘आधार’ काढल्यामुळं बँकांच्या  खर्चात वाढ

४ ) घरातली मुले विचारतात, बाबांच्या वस्तू दाखव म्हणून, तुमचा धैर्यधराच्या भूमिकेतला कोट आहे, तंबोरा आहे, माझ्या वाढदिवशी दिलेले लॉकेट आहे. ते मुलांना दाखवते. खरे तर, हे सारे तुम्हीच दिलेले आहे. आमच्या धमन्यांतून वाहणारे रक्तही तुमचंच आणि आमच्या कंठातले स्वरही.

तुमच्या मुलांचे वैभव पाहायला तुम्ही हवेत, असे फार फार वाटते.