5 पोलिस अधिकार्‍यांची गुन्हे शाखेत बदली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस उपनिरीक्षकांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्‍तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी रात्री काढले आहेत. प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार पोलिस अधिकार्‍यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास मुंढे (पिंपरी पोलिस स्टेशन ते अंमली पदार्थ विरोधी पथक / आर्थिक गुन्हे शाखा), पी. सी. चाटे (विशेष शाखा ते खंडणी/दरोडा विरोधी पथक), व्ही. बी. बडे (पिंपरी पोलिस स्टेशन ते खंडणी/दरोडा विरोधी पथक), प्रशांत महाले (वाहतूक शाखा ते ते अंमली पदार्थ विरोधी पथक / आर्थिक गुन्हे शाखा) आणि वसंत मुळे (एमआयडीसी भोसरी ते अंमली पदार्थ विरोधी पथक / आर्थिक गुन्हे शाखा). गेल्या काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उप निरीक्षक आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

 

जाहिरात