पिंपरी-चिंचवड महापालिकेने ११ महिन्यात पाडली तब्बल १ हजार ५५ अनधिकृत बांधकामे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने २०१८ मधील ११ महिन्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २५१ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून १०५५ अनधिकृत बांधकामे पडली आहेत. तर ५३४८ बांधकामधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा हा नेहमीच चर्चेचा ठरला आहे. राजकीय पक्षांनी या विषयाचे निवडणुकीत भांडवल केले. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका या प्रश्नांवरच लढविल्या गेल्या. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा शब्द सत्ताधारी पक्षाने शहरातील जनतेला दिला होता.  मात्र राज्यातील सरकराला चार वर्ष पुर्ण होत आली. तरी, देखील शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित झाली नाहीत. त्यामुळे शहरवासियांवार कारवाईची टांगती तलवार आजही कायम आहे. सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, न्यायालयात तो टिकला नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामावरील कारवाई वेगात सुरु केली आहे. वर्षभरात अनधिकृत बांधकामे केल्याप्रकरणी तब्बल २५१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ या कायद्यानुसार अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यासंदर्भात कलम (५३) नुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत तीन हजार ७०७ जणांना नोटीस दिल्या आहेत.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम या कायद्याअंतर्गत महापालिका आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय केलेले बांधकाम काढण्यासंदर्भात एक हजार ६४१ जणांना बांधकाम पाडण्याबाबत नोटीसा दिल्या आहेत. तसेच या नोटीसीनुसार बांधकाम पाडण्याचा खर्च देखील संबंधितांकडून वसूल केला जातो. त्याचबरोब महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या ११ महिन्यात एक हजार ५४ अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहे. त्याचे क्षेत्रफळ ७६ हजार ८१३ चौरस मीटर आहे.

खळबळजनक ! दूरदर्शन मधील १० महिलांनी केला लैंगिक छळाचा आरोप